आयटीआयमधील तासिका तत्त्वावरील निदेशक कशामुळे येणार अडचणीत ?

ITI Tasika Directional In trouble Due To New Recrutment
ITI Tasika Directional In trouble Due To New Recrutment
Updated on

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - राज्यात 2011 पासून शिक्षक भरती बंद आहे. गेल्या अनेक वर्षापासून कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील आयटीआय निदेशकांची पदे रिक्त आहेत. आयटीआयमधील जवळपास 700 निदेशकांची पदांची भरती करण्यात येणार आहे.

याबाबत विभागाने संचालनालयाला स्मरणपत्र देत लवकरात लवकर पदभरतीची कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या आयटीआयमधील तासिका तत्वावरील अनुभवी शिक्षकांचे भवितव्य धोक्‍यात येणार आहे. राज्यात 417 आयटीआयमध्ये सुमारे 2 हजार 700 तासिका निदेशक तर जिल्ह्यात 8 आयटीआयमध्ये जवळपास 25 निदेशक कार्यरत आहेत. 

राज्यात कार्यरत असलेल्या निदेशकांवर गेल्या दहा वर्षापासून अन्याय होत असून प्रत्येक अधिवेशनात केवळ खोटी आश्‍वासने देऊन तासिका तत्त्वावरील निदेशकांची फसवणूक केली जात आहे. यावरून तासिका निदेशकांचा कौशल्य विभाग केवळ वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

गेली अनेक वर्षे तुटपुंज्या मानधनात आयटीआयमधील कौशल्य प्रशिक्षण व कुशल कारागीर घडविण्याचे हे काम निदेशक करत आहेत. राज्यामध्ये जवळपास 60 टक्के पदे ही आयटीआयमध्ये निदेशकांची आहेत. असे असतानाही त्यांना अनेक वर्षे काम करूनही प्रमाणपत्र देखील देण्यात येत नाही. असे असतानाही निदेशकांच्या जागी होणाऱ्या पदभरतीमुळे दुसरीकडे महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीने राज्यातील शासकीय आयटीआयमधील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या निदेशकांना कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने सामावून घ्यावे, अशी मागणीही शिक्षण संचालकांकडे केली आहे. 

सद्यस्थिती पाहता करणाची भयंकर परिस्थिती जगामध्ये निर्माण झाली आहे. याचा फटका देशाला आणि राज्यालाही झाला आहे. असे असतानाही राज्यातील कौशल्य विभाग मात्र निदेशकांच्या जाग्यावर पदभरती करण्याची घाई करत आहे. पदभरती करण्यासंबंधीचे स्मरणपत्र नुकतेच 13 एप्रिलला जाहीर केले आहे. यापूर्वी ज्या-ज्या वेळी शासकीय आयटीआयमध्ये पदभरती करण्यात आली आहे. त्यावेळी कुशल काम कारागीर घडविणाऱ्या निदेशकांना मात्र वेळोवेळी डावलण्यात आले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता 8 शासकीय आयटीआय आहेत. यामध्ये जवळपास 24 ते 26 तासिका तत्वावरील शिकविणारे निदेशक कार्यरत आहेत. यांनाही ही पदभरती झाल्यास मोठा फटका बसणार असून बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ येऊ शकते.

राज्यातील 417 आयटीआयमध्ये सुमारे 1 लाख 30 हजार प्रशिक्षणार्थी कुशल कारागीर बनण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. जिल्ह्यांमध्येही हजारो विद्यार्थी शासकीय आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या आयटीआयच्या संपूर्ण धुरा हे तासिका निदेशक सांभाळत आहेत. एकीकडे निदेशकांची गळती नसतानाही हेच निदेशक अनेक वर्षापासून पूर्ण जबाबदारीने काम करीत आहेत. विद्यार्थी भरती ते परीक्षा सर्व काम तेच सांभाळत आहेत. महाराष्ट्रात जवळपास 2700 निदेशक कार्यरत आहेत. त्यापैकी 700 पदांची भरती करण्यात येणार आहे. 

राज्यातील 'क' गट निदेशकांच्या पदांची आकडेवारी 

  • राज्यातील आयटीआयची संख्या 417 
  • शिक्षकांची मंजुर पदे 7923 
  • तासिका तत्वावरील नियुक्त निदेशकांची संख्या 2646 
  • सिंधुदुर्गातील निदेशकांची संख्या 25 

""अनुभवी तासिका निदेशकांना कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने सामावून घ्यावे. भरती करण्याअगोदर तासिका निदेशकांचा प्रश्‍न प्राधान्याने सोडवावा. अन्यथा पदभरती थांबवावी. शासनाने याबाबतीत दुर्लक्ष व टाळाटाळ केली तर संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात येईल.'' 
- अनिलकुमार होटकर, अध्यक्ष, महाराष्ट्र आयटीआय निदेशक संघर्ष समिती 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com