"सहकार' समितीच्या सदस्यपदी जयवंत जालगावकर 

Jaywant Jalgaonkar As A Member Of Co operative Division Committee
Jaywant Jalgaonkar As A Member Of Co operative Division Committee
Updated on

दाभोळ ( रत्नागिरी ) - राज्यातील व्यावसायिक व नोकरदार यांना कर्जपुरवठा करण्यासाठी नागरी सहकारी बॅंका व नागरी, ग्रामीण पतसंस्था यांचे योगदान आहे. कोवीड 19 च्या लॉकडाउनमुळे या सर्वच संस्थांवर होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने महाराष्ट्र राज्य अर्बन बॅंक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठित केली आहे. समितीच्या सदस्यपदी सहकार तज्ञ व दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

समितीत सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी बॅंका तसेच नागरी व ग्रामीण पतसंस्थांचे पदाधिकारी यांचा समावेश केला आहे. समितीच्या सदस्यपदी अप्पर निबंधक सहकारी संस्था, पुणेचे डॉ. पी. एल. खंडागळे, प्रादेशिक सहसंचालक साखर, पुणेचे धनंजय डोईफोडे, दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच पुणेचे अध्यक्ष काका कोयटे, ज्ञानदीप नागरी सहकारी पतसंस्था मुंबईचे चेअरमन जिजाबा पवार, सहकार आयुक्‍त कार्यालयातील उपनिबंधक आनंद कटके, तर सहकार आयुक्‍त कार्यालयातील उपनिबंधक मिलिंद सोबले हे या समितीच्या सदस्य सचिव म्हणूून काम पाहणार आहेत. समितीने आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करावयाचा आहे. 

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम नागरी सहकारी बॅंका व पतसंस्थांनी दिलेल्या कर्जव्यवहारावर झाला आहे. सहकारी बॅंका व पतसंस्था यांना ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याज नियमीत द्यावे लागत असताना दुसरीकडे व्यवसायच होत नसल्याने कर्जदारांना हप्ते भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे बॅंकाही अडचणीत आल्या आहेत. बॅंक कर्मचाऱ्यांचे पगार व अनेक आनुषंगिक खर्च सुरूच राहणार असल्याने बॅंकांना गंगाजळीचा वापर करावा लागणार आहे. निवडीबद्दल जालगावकर यांचे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com