
पाली : सुधागड तालुक्यातील परळी या गावातून एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. पाली पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार 24 मार्च ते 1 एप्रिल च्या दरम्यान ही घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे भावाच्या मेव्हण्यानेच ही चोरी केली. या चोराला पाली पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे.