Jitendra Awhad : सिंधुदुर्गातून जातीय विद्वेष पसरवला जातोय: जितेंद्र आव्हाड, आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष रस्त्यावरची लढाई लढणार

Ratnagiri : ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमधून जातीय विद्वेषाची भाषा पसरवली जात आहे. सरकारमधील मंत्रीच जातीय विद्वेषाची भाषा करत आहेत. त्यांना संविधानावर हात ठेवून घेतलेल्या शपथेचा विसर पडला आहे.
jitendra awhad
jitendra awhadsakal
Updated on

रत्नागिरीः स्थानिक स्वराज्य निवडणुका घेतल्या जात नाहीत, ओबीसी आरक्षणात खेळखंडोबा करून ठेवलेला आहे. हे प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांना समजावून देऊन त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दौऱ्यावर आलो आहे. कोकणात राष्ट्रवादीसाठी चांगले वातावरण आहे. कोकण हा वैचारिक प्रदेश आहे. ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमधून जातीय विद्वेषाची भाषा पसरवली जात आहे. सरकारमधील मंत्रीच जातीय विद्वेषाची भाषा करत आहेत. त्यांना संविधानावर हात ठेवून घेतलेल्या शपथेचा विसर पडला आहे. ही परिस्थिती समाजाला घातक आणि अस्वस्थता पसरवणारी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार पक्ष) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

रत्नागिरीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मिरकरवाडा येथील जेटीची पाहणी केली. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना आमदार आव्हाड म्हणाले, ‘‘सरकारबद्दल लोकांत नाराजी आहे. बहुमत असतानाही लोककल्याणकारी योजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. शेतकरी कर्जमाफीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार मी असे म्हणालोच नाही, असे सांगत फिरत आहेत. एका विशिष्‍ट गटाचे व पक्षाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन धार्मिक तणाव कसा वाढेल याकडे जाणुनबुजून लक्ष देत फिरत आहेत. कुणी बेकारीवर, महागाईवर, महिलांवरील अत्याचारावर, कायदा व सुव्यस्थेवर बोलायला तयार नाहीत. सर्वत्र अपयश असतानाही धार्मिक विद्वेष पसरवण्याचे काम मात्र सरकारमधीलच लोक करत आहेत. सध्या पुरोगामी महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम सुरू आहे. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या समाजाचे तुकडे करून काय साध्य होणार आहे, हेच समजत नाही.’’

पहलगाम येथील घटनेवर ते म्हणाले, ‘‘पहलगाम येथील प्रकारानंतर काश्मिरी लोकांनी जीव धोक्यात घालून पर्यटकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांची वाहव्वा मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनीही केली. घटना घडली तेव्हा तिथे एकही सैनिक नव्हता. हे धक्कादायक असून केंद्र सरकारचे ते अपयश आहे. यासंदर्भात कुणी प्रश्न विचारला तर त्याला ताब्यात घेतले जाते. मात्र त्या घटनेच्या जबाबदारीवर कोणीही बोलायला तयार नाही. राष्ट्रावर झालेल्या आक्रमणाविरोधात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत.

पाकिस्तानला जो काही धडा शिकवायचा आहे, तो शिकवा. मात्र देशातील सैनिकांची संख्या कमी का, यावर उत्तर द्यायला कोणी नाही. सैनिकांना निवृत्ती वेतन दिले जात नाही. मात्र जनतेपासून काहीतरी लपवून ठेवून द्वेषाचं राजकारण केले जात आहे. सध्या स्वतःचं राजकीय अपयश झाकण्यासाठी दोन समाजात कोंबडे झुंजवले जात आहेत, अशी टीका आव्हाड यांनी केली.

मंत्रालयात नवीन सिस्टीम
सध्या मंत्रालयात नवीन सिस्टीम सुरू झाली आहे. सगळ्या फाईली मंत्रालयात पाठवायच्या. त्यांचे दलाल सकाळीच गाडी पकडून मंत्रालयात जातात, असा संशय आमदार आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘‘जातीय जनगणेनत हेराफेरी झाली, तर सगळं संपलंच. त्यामुळे आता पाहूया सरकार काय करते. महाराष्ट्रात दलितांवर, मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. आम्ही एका पराभवाने खचून जाणारे नाहीत. एका पराभवाने पक्ष संपत नसतो. आम्ही लढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही. ते लोकशाहीचा पाया उद्‍ध्वस्त करीत आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com