Journalist Day Special; कनकाडीत मिळाली १४५ वर्षांपूर्वीची ‘जगन्मित्र’, ‘सत्यशोधक’ वृत्तपत्रे!

Newspapers from 145 years ago found in Kankadi sakharpa ratnagiri
Newspapers from 145 years ago found in Kankadi sakharpa ratnagiri

साखरपा (रत्नागिरी) : कनकाडीत तब्बल १४५ वर्षांपूर्वीची वृत्तपत्रे सापडली आहेत. ग्रामस्थ सरला विष्णू पंडित यांच्या घरी ‘जगन्मित्र’ आणि ‘सत्यशोधक’ या दोन वृत्तपत्रांचे दोन अंक सापडले आहेत. 


सरला विष्णू पंडित (वय ९४) या रत्नागिरी येथे राहतात. नुकत्याच त्या त्यांच्या कन्या ज्योती गडवी आणि विद्या करंबेळकर तसेच अरविंद गडवी, प्रकाश करंबेळकर यांच्यासह मूळ गावी कनकाडी येथे आल्या होत्या. घराची साफसफाई करत असताना त्यांना एका ट्रंकेत वृत्तपत्रांचे जुने अंक सापडले आहेत. यात ‘जगन्मित्र’चे १८७४ आणि १८८० या सालातील तर ‘सत्यशोधक’चे १९०९ आणि १९१६ सालचे अंक आहेत. 

दोन्ही वृत्तपत्रांचे वैशिष्ट्य म्हणजे वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग असलेले संपादकीय त्यामध्ये नाही. बहुतांश मजकूरासोबत जाहिराती आहेत. सत्यशोधक वृत्तपत्रात इंग्रजी आणि मराठी भाषांमधील वृत्त एकत्रच छापलेली दिसतात. या वृत्तपत्रात त्यावेळी सुरू असलेल्या युरोपमधील युद्धाचे वृत्त छापण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पुणे येथील प्लेगची बातमीही वाचावयास मिळते.  देवळे आणि कनकाडीसारख्या दुर्गम खेड्यात दीडशे वर्षांपूर्वी वृत्तपत्र येत असल्यामुळे त्या काळातही वृत्तपत्रे लोकप्रिय होती, हे सिद्ध होते.

एक दृष्टिक्षेप..  
१८७४ आणि १८८० तील जगन्मित्र
१९०९ आणि १९१६ मधील सत्यशोधक
 इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये मजकूर
चार पानी, प्रत्येक पानावर चार कॉलम       
दीड शतकांनंतरही येते वाचता 
दोन्ही वृत्तपत्रात संपादकीय भाग नाही

जगन्मित्रमधील अक्षर छपाई मोडी लिपीच्या धर्तीवर
जगन्मित्र वृत्तपत्र मात्र मराठी भाषेत आहे. पण या वृत्तपत्राची अक्षर छपाई मोडी लिपीच्या धर्तीवर आहे. जगन्मित्र वृत्तपत्रात दोन्ही अंकात शेवटच्या पानावर पर्जन्य कोष्टक छापण्यात आलेले आहे. कालओघात या वृत्तपत्रांचा कागद पिवळा पडला असला तरी त्यावरील छपाई मात्र स्पष्ट वाचता येण्यासारखी आहे.

 देवळे कनकाडी या गावातील नोटिसा छापण्यात आल्यामुळे त्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व खेड्यातील जनतेने जाणले होते.      
- प्रकाश करंबेळकर, अरविंद गडवी 

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com