कबुलायतदार प्रश्‍नी निवडणूक बहिष्काराची तयारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्न सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक रखडवून ठेवला, असा आरोप करत निवडणुकीत बहिष्कार टाकण्यासाठी वाडीवाडीवर बैठका येणार असल्याचे येथील कबुलायतदार गावकर समन्वय कृती समितीने पत्रकार परिषदेत सांगितले.

आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्न सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक रखडवून ठेवला, असा आरोप करत निवडणुकीत बहिष्कार टाकण्यासाठी वाडीवाडीवर बैठका येणार असल्याचे येथील कबुलायतदार गावकर समन्वय कृती समितीने पत्रकार परिषदेत सांगितले. 

आंबोलीत गेली दोन वर्षे कृती समिती कार्यरत असून वीस वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यास प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. ही समिती कुठल्याही राजकीय पक्षांशी संबंधित नसून यात सर्व समाजाची तसेच सर्वपक्षीय माणसे आहेत. फक्त प्रलंबित असलेल्या जमीनप्रश्नी संघटित झालेली आहेत.

या समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयीन पातळीवर बैठका होऊन हा प्रश्न अंतिम टप्प्यात आलेला आहे; मात्र काहीजण राजकीय हेतूने प्रेरीत होवून यात खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नी ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांच्या सहमतीने प्रस्ताव सादर केला असताना चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकिचा आढावा घेउन पालकमंत्री यांनी ज्यांचे प्रश्न सोडविणार आहोत त्या ग्रामस्थ अथवा प्रतिनिधींना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता महसुलमंत्री यांच्यासोबत परस्पर बैठक आयोजित करुन त्रिसदस्यीय समिति नेमने कितपत योग्य आहे. असा सवाल त्या समितीने केले आहे. 

समितीच्या म्हणण्यानुसार पालकमंत्री केसरकर यांच्या वक्तव्यावर दिसुन येते की गेले चार महिने त्यांनी आंबोलीच्या ग्रामस्थांशी संपर्क केलेला नसून येथे चार महिन्यात काय घडले याची कल्पना देखील त्यांना नाही. हा प्रश्न मुळात ग्रामस्थांना लवकरात लवकर न्याय मिळावा तसेच राजकीय स्वार्थासाठी आंबोली, चौकुळ, गेळे ग्रामस्थांना वेठीस न धरता सोडवावा तसेच हा प्रश्न ग्रामस्थांना विचारात घेउन सोडवावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर गावपातळीवर बैठक घेऊन बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथिल कबुलायतदार समितीने दिला. आहे.यावेळी समिती अध्यक्ष शशिकांत गावडे, सचिव भारतभूषण गावडे, उल्हास गावडे, रामचंद्र गावडे, श्रीकांत गावडे, प्रकाश गुरव आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kabulayatdar committee is to prepare for the election boycott