शिव थाळीला सावंतवाडीत टक्कर कमळ थाळीची 

Kamal Thali In Sawantwadi From Tomorrow Sindhudurg Marathi News
Kamal Thali In Sawantwadi From Tomorrow Sindhudurg Marathi News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरात 22 एप्रिलपासून कमळ थाळी सुरू करण्यात येत आहे. गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे असेही ते म्हणाले. 

याबाबत जिल्हा प्रशासनासह मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे, असेही श्री. तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ""शहरात बॅ. नाथ पै सभागृहात मोफत कमळ थाळी सुरू करण्यात येणार आहे. त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा. कमळ थाळीची जबाबदारी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतली आहे. पहिल्या दिवसाची कमळ थाळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्याकडून दिली जाणार आहे. त्यानंतर लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम याठिकाणी सुरू राहणार आहे.'' 

श्री. तेली म्हणाले, ""एकही व्यक्ती लॉकडाऊन काळात उपाशी राहता कामा नये, अशा सूचना आम्हाला केंद्र शासनाकडून तसेच केंद्र व राज्यातील भाजपच्या अध्यक्ष, नेते यांच्याकडून दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 22 एप्रिलपासून 19 एप्रिलपर्यंत 25 हजार 613 लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. तर 76 हजार 318 जणांना सॅनिटायझर-मास्कचे वाटप केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 378 गावात भाजपच्या माध्यमातून जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. तर पंतप्रधान फंडासाठी जिल्ह्यातील 1990 लोकांनी मदतनिधी दिला आहे.'' 

ग्रामपंचायतींना 25 टक्के रक्कम देऊन कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. सफाई कामगारांना 90 दिवसांचा 25 लाखांपर्यंत विमा उतरविला जावा, अशी मागणी भाजपने पंतप्रधानांकडे केली आहे. त्याबाबत पंतप्रधान साकारात्मक आहेत, असे राजन तेली यांनी सांगितले. 

यावेळी नगरसेवक राजू बेग, सुधीर आडीवरडेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समुध्दी विरनोडकर आदी उपस्थित होते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com