हृदयद्रावक ; कनिकाला त्या अवस्थेत पाहून आईने केला आरडाओरडा, कपड्यात अडकून गेला होता तिचा जीव

kanika 11 year girl dead in ratnagiri
kanika 11 year girl dead in ratnagiri

रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील तारा पार्कच्या बी विंगच्या टेरेसवर खेळणाऱ्या अकरावर्षीय बालिकेचा कपड्यात अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रात्री घडली.  

सुधीर चुनेकर पत्नी, दोन मुलांसह राहतात. काल सायंकाळी सर्वजण घरात असताना मुलगी कनिका चुनेकर ही टेरेसवर दोरीवर वाळत टाकलेल्या कपड्याजवळ ती खेळत होती. परंतु, बराच वेळ ती घरी न परतल्याने आई तिला शोधण्यासाठी टेरेसवर गेली. तिथे कनिका गळ्यात कपडा अडकलेल्या स्थितीत आढळली. आईने आरडाओरड केली. इतर घरातील सदस्य धावत आले. त्यांनी कनिकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com