कणकवली : फोंडाघाटमध्ये 'महावितरणला' घेराओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kankavali MSEB Fondaghat Shiv Sena aggressive delay power connection

कणकवली : फोंडाघाटमध्ये 'महावितरणला' घेराओ

कणकवली : ग्राहकांना वीज जोडणी देताना फोंडाघाट वीज अभियंता विलंब करतात. वाणिज्‍य आणि औद्योगिक ग्राहकांकडून वीज जोडणीकरता पैसे मागितले जातात, असे आरोप करत शिवसेना पदाधिकऱ्यांनी फोंडाघाट येथील वीज अभियंत्‍यांना घेराओ घातला. तसेच आठ दिवसांत प्रलंबित वीज जोडणी न दिल्‍यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

फोंडाघाट येथील रुपेश रमेश नारकर यांना कारखाना सुरू करण्यासाठी थ्री फेज कनेक्शनची गरज असल्याने त्यांनी आठ महिन्यांपूर्वी फोंडाघाट महावितरण शाखेमध्ये अर्ज केला होता; मात्र त्‍यांना वीज जोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. ही बाब त्‍यांनी जिल्‍हा परिषद सदस्य संजय आंग्रे यांना सांगितल्‍यानंतर त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश पटेल, रंजन चिके, अनिल नानचे, राजेश शिरोडकर, अविनाश सापळे, राजू पटेल, भाई हळदिवे, राजन नानचे, बाबू सावंत, ध्रुवा गोसावी आदींनी महावितरण कार्यालयात जाऊन तेथील अभियंत्‍यांना जाब विचारला.

यवेळी रूपेश नारकर म्हणाले की, वीज जोडणीसाठी सुरवातीला आपणाकडे २ लाखाची मागणी केली. ही रक्‍कम न दिल्‍यामुळे वीज जोडणी दिलेली नाही. दरम्‍यान, श्री. आगे यांनी आठ दिवसांत सर्व प्रलंबित वीज जोडणी द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

Web Title: Kankavali Mseb Fondaghat Shiv Sena Aggressive Delay Power Connection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top