राणेंच्या आंदोलनाचे कणकवली पंचायत समिती सभेत समर्थन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

कणकवली - राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकारी पंचायत समितीच्या सभेला उपस्थित राहत नाहीत. तालुक्‍यातील जनतेचे अनेक प्रश्‍न असन लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ते मांडायचे असतात; मात्र हे अधिकारी येत नसल्याने लोकप्रतिनिधींना अखेर वेगळ्या मार्गाने विकास काम करून घ्यावे लागते; पण सरकार बळाचा वापर करून लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करतात, अशी नाराजी आजच्या पंचायत समितीच्या सभेत व्यक्त करण्यात आली.

कणकवली - राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकारी पंचायत समितीच्या सभेला उपस्थित राहत नाहीत. तालुक्‍यातील जनतेचे अनेक प्रश्‍न असन लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ते मांडायचे असतात; मात्र हे अधिकारी येत नसल्याने लोकप्रतिनिधींना अखेर वेगळ्या मार्गाने विकास काम करून घ्यावे लागते; पण सरकार बळाचा वापर करून लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करतात, अशी नाराजी आजच्या पंचायत समितीच्या सभेत व्यक्त करण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी केलेले आंदोलन जनतेसाठी होते. असे समर्थन करून शासनाने केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

कणकवली पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज सभापती सुजाता हळदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, उपसभापती सुचिता दळवी, तसेच सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला गैरहजर अधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम, विजवीतरण, कृषी विभाग, सहाय्यक निबंधक, एसटी, अशा विविध खात्याचे अधिकारी गैरहजर होते. पावसाळ्यात अनेक समस्या आहेत. जनतेला त्रासहोत आहे. याबाबत कुणाला जाब विचारायचा, उत्तर कोण देणार, लोकप्रतिनिधी वेळ वाया घालवायला येतात का, हा आमचा अवमान आहे. महिन्यातून एकदा सभा होते पण अधिकारीच गैरहजर राहतात. मग सभेला अर्थ काय असा प्रश्‍न सदस्य मनोज रावराणे, प्रकाश पारकर, गणेश तांबे यांनी उपस्थित केला.

याबाबत कारवाईचा ठराव घेवून वरीष्ठांकडेपाठविला जाईल अशी सुचना बिडीओनी केली. राज्य सरकारच्या अखत्यारीतील अधिकाऱ्यांवर कारवाईचा अधिकार आम्हाला नाही असे त्यांनी सांगितले. याच कालावधीत महिला आणि बालकल्याण विभागाचे प्रकल्पअधिकारी अमोल पाटील सभागृहात आले.त्यांनी आम्हाला सभेचे पत्र मिळाले नाही असे सांगितले. मात्र अजेंड्यावर पोच असलेली सही त्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची होती. मी आवक जावक रोज सकाळी तपासत असतो, मला अजूनही सभेचा अजेंडा मिळालेला नाही अशी भूमिका श्री. पाटील यांनी घेतली.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण विभागाचे शाखा अभियंता उपस्थित होते. त्यांना महामार्गाच्या दुरावस्थेबाबत प्रश्‍नविचारण्यात आला. कासार्डे येथील उड्डाणपुलाखाली नादुरूस्त रस्त्याचे फोटो प्रकाश पारकर यांनी सभागृहासमोर दाखविले. संपूर्ण महामार्गाच्या निकृष्ठ कामाबाबत जसे गैरहजर कर्मचाऱ्यांवरील कारवाई, आरोग्याची रिक्त पदे भरावीत, महामार्गावरील प्रवाशी शेड पक्‍क्‍या कॉंक्रीटच्या असाव्या असा ठराव घेण्यात आला. कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात 8 रिक्तपदे असल्याचे दिलीप तळेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

महत्वाचे ठराव 

  • महामार्गाचे निकृष्ठ काम 
  • गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई
  • आरोग्य विभागाची रिक्त पदे भरा
  • महामार्गावरील बसथांबे कॉंक्रीटचे हवे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kankavali Panchayat Samitti meeting support to MLA Rane agitation