कणकवली : ‘‘देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’योजनेंतर्गत (Agristack Project) फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) तयार करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करून घ्यावेत,’’ असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे (Tehsildar Dikshant Deshpande) यांनी केले.