Kankavli 11-Year-Old Boy Death
esakal
कणकवली (सिंदुधुर्ग) : भाजीच्या दुकानात बसलेल्या ११ वर्षीय मुलाचा अचानक उलटी होऊन मृत्यू (Kankavli Boy Death) झाला. अजय लालू चव्हाण (वय ११) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास तेलीआळी डीपी रोड येथे घडली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू, अशी नोंद झाली आहे.