कोकणातील ‘सावडाव’ धबधबा प्रवाहित मात्र पर्यटकांअभावी सुनाच!

दरवर्षी हजारो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात
कोकणातील ‘सावडाव’ धबधबा प्रवाहित मात्र पर्यटकांअभावी सुनाच!
Updated on

नांदगाव : कणकवली (kankavli) तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत (mumbai-goa highway) असणारे निसर्गरम्य वर्षा पर्यटनस्थळ म्हणजे सावडाव धबधबा. (sawdav waterfall) गेली काही दिवस मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याने सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनासाठी तो आकर्षित करत आहे; मात्र कोरोनाचे संकट (covid-19) असल्यामुळे यंदाही वर्षा पर्यटनाला (rain tourism) हौशी पर्यटक मुकले आहेत. व्यवसायच ठप्प असल्याने सध्या धबधबा परिसरात धबधब्याच्या पाण्याचा अन् पक्षांचा किलबिलाटच ऐकू येतो.

पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कनार्टकसह महाष्ट्रातील अनेक पर्यटकांना भुरळ घालणारा सावडाव धबधबा आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात. स्थानिक प्रशासनाने पर्यटन बंद केल्याने परिसर सुन्न झाला आहे. कोरोनामुळे दरवर्षी गर्दी करणारे वर्षा पर्यटक दिसत नसल्याने कमालीची शांतता आहे. पर्यटक नसल्याने येथील व्यावसायिकांचा रोजगार बंद झाला असून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या अभ्यंगत करातील उत्पन्नात घट झाली.

कोकणातील ‘सावडाव’ धबधबा प्रवाहित मात्र पर्यटकांअभावी सुनाच!
मराठा मागास ठरवण्याच्या हालचाली ठप्प : निलेश राणे

सावडाव धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यावर अनेक सुविधा धबधबा परिसरात निर्माण झाल्या आहेत. शांत शितल व सुरक्षित धबधबा म्हणून ओळख असलेल्या धबधबा परिसरात दरवर्षी चिमुकल्यांसह अबालवृद्धांपर्यंत सर्वच जण येथे हजेरी लावायचे. कोरोनाचे सावट लक्षात घेता येथील पर्यटन बंद केल्याचे सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे, ग्रामसेवक शशिकांत तांबे यांनी सांगितले.

"सावडाव धबधब्याच्या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय होता. मोठ्या संख्येने पर्यटक येत होते. यामुळे रोजगार मिळत होता. कोरोनामुळे धबधबा बंद असल्याने पर्यटक येत नाहीत. व्यवसाय बंद असल्याने उपासमार होत आहे. व्यावसायिकांना शासनाने मदत करावी."

- आनंद वासुदेव नरसाळे, हॉटेल व्यावसायिक, सावडाव धबधबा

कोकणातील ‘सावडाव’ धबधबा प्रवाहित मात्र पर्यटकांअभावी सुनाच!
Success Story:दुबईच्या मार्केटमध्ये सांगलीचा ड्रॅगन; पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com