

Maharashtra Police News Kankavli Woman Head Constable Death Case Husband Police Constable Booked in Investigation
sakal
कणकवली: येथील पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यूला तिचा पती पोलिस शिपाई सचिन माने हाच जबाबदार आहे. त्याच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद स्मिता यांची बहीण रेश्मा जाधव (रा. हुंबरट-पिंपळवाडी) यांनी पोलिसांत दिली. सचिन माने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून कुडाळचे पोलिस निरीक्षक विकास बडवे तपास करीत आहेत.