मिटुनी लोचने गाणारा दीप जोशी ठरला पहिला आयडॉल : ३८ जणांनी घेतला होता सहभाग...

Karaoke singing competition in Mandangad Participation of 38 people and winner is Deep Joshi first idol
Karaoke singing competition in Mandangad Participation of 38 people and winner is Deep Joshi first idol

मंडणगड (रत्नागिरी)  : मिटुनी लोचने, घे भिरभिरती हे नटसम्राट चित्रपटातील अप्रतिम भावनिक गाणे आपल्या सुमधुर आवाजात गाणारा मंडणगड तालुक्यातील बोरखत गावचा दीप जोशी पहिला कराओके सिंगिंग मंडणगड आयडॉल ठरला. संगीत संयोजक निलेश लांबे यांच्या वारसा मराठीचा या ग्रुपच्यावतीने 15 जुलै 2020 रोजी आधुनिक तंत्रज्ञान आधारे आयोजीत करण्यात आलेल्या मंडणगड आयडॉल कराओके सिंगीग स्पर्धेत त्याने विजेतेपदाचा मान मिळवीला. तर अनुष्का लेंढे व आर्या यादव यांनी लिटील चँम्प हा किताब मिळवीला. या स्पर्धेमुळे मंडणगड तालुक्यातील कलाकारांना आपले कलागुण प्रकट करण्याची संधी मिळाली.
 
 लॉक डाऊनच्या कालावधीत मोबाईल तंत्रज्ञान व इंटरनेटच्या मदतीने घेण्यात आलेली ही स्पर्धा वेगळ्या उपक्रमामुळे कमालीची  यशस्वी झाली. तालुक्यातील 38 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत पुर्वा कर्वे यांनी व्दितीय तर सायली सोविलकर हिने तृतीय पुरस्कार मिळवीला. दीपांजली धाडवे यांना जजेस चॉईस अवार्ड मिळाले. अंकीता सोविलकर, पुजा कर्वे, सिध्दी कासारे, तेजकुमार लोखंडे, नुपुर लांबे यांना उत्तेजनार्थ पारितोषीक मिळाले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून नरेंद्र गायकवाड (पुणे), संजय घोलेकर (डोंबीवली) सचिन शिंदे (बोरीवली) यांनी काम पाहीले. 


स्पर्धकांना अभिनेते नचीकेत लेले, अमोल हडकर, समीर धर्माधीकारी, अंजन घोष, करण पांचाळ, कवीता जावळेकर, रुही शेंडगे या सेलिब्रीटी कलाकारांनी वेळोवेळी प्रोत्साहीत केले. विजेत्यांना वारसा मराठी या ग्रुपच्यावतीने आकर्षक बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आली. 


याशिवाय मंडणगड आयडॉल म्हणून निवड झालेल्या विजेत्या स्पर्धकांचे एक गाणे दीपकीक रेकॉर्डीग स्टुडीओ पुणे येथे ध्वनीमुद्रीत करण्यात येणार असल्याची घोषणा स्टुडीओचे मालक सागर मोरे यांनी केली. स्पर्धेची तांत्रीक बाजू अभिजीत यांनी उत्तमपणे सांभाळली. स्पर्धेचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश लांबे, जयेश घोसाळकर, नितीन लांबे, दिलीप मराठे यांनी मेहनत घेतली. दोन फेऱ्यातील स्पर्धा अतिशय रंगतदार झाली. मोबाईल तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन तासांहूून अधिक काळ चाललेला स्पर्धेचा कार्यक्रम व स्पर्धकांची मंडणगड ऑयडॉल या युट्युब चँनेलवर प्रसारीत करण्यात आली असल्याची माहीती आयोजकांच्यावतीने देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच अडकून असणाऱ्या कलाकारांना या स्पर्धेमुळे सुवर्णसंधी मिळाली. विविध प्रकारची गाणी गायल्याने या माध्यमातून सराव होवून संगीत तज्ञांकडून टेक्निकल माहिती मिळाली. ऑनलाइन स्पर्धेचा वेगळा अनुभव सर्व स्पर्धकांना घेता आला. तालुक्यातील टॅलेंट दिसून आले असून सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली आहे.
दिलीप मराठे

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com