

Tree cutting for the Sai Dongar-1 project in Karjat has been halted amid growing opposition.
esakal
कर्जत (जि. रायगड) : टोरंट पॉवर कंपनीच्या कर्जत तालुक्यातील साई डोंगर-१ प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांच्या होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, जंगलातील वृक्षतोड थांबविण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून समोर आली आहे. मात्र, वृक्षतोड थांबली असली तरी प्रकल्पाविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.