करूळ घाटात टेम्पो-ट्रॅव्हल्स धडकेत महिला गंभीर जखमी

तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली.
Karul Ghat Accident
Karul Ghat Accident Esakal

वैभववाडी : टायर फुटल्यामुळे पलटी झालेल्या ट्रक मागाहुन आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलसला धडकला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असुन अन्य तीन चार महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातानंतर तब्बल सात तास तळेरे-कोल्हापुर ( Kolhapur) राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली. हा अपघात आज (ता.१७) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला.

आंदोलनाच्या इशारानंतर देखील करूळ घाटातील (Karul Ghat) रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. सहा ते सात फुटाचे खड्डे असल्यामुळे वाहने कंलडण्याचे, टायर फुटण्याचे प्रकार घाटात दररोज घडत असतात. त्यामुळे वाहन चालक मेटाकुटीस आले आहेत. मागील महिन्यात एकाच आठवड्यात चारदा वाहतुक ठप्प झाली होती.

Karul Ghat Accident
राष्ट्रवादी - शिवसेना प्रचाराचा नारळ फुटला; देवगडातून सुरुवात

दरम्यान आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ऊसाचा लगदा घेवुन घाट उतरत असणाऱ्या ट्रकचा पुढील टायर फुटला. त्यामुळे ट्रक एका बाजुला पलटी झाला. त्याच दरम्यान बाजु घेवुन प्रवाशी वाहतुक करणारी टेम्पो ट्रॅव्हलस जात होती. त्या गाडीला पलटी झालेल्या ट्रकची धडक बसली .या गाडीतुन १६ ते १७ महिला प्रवास करीत होत्या. त्यातील एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे तर अन्य तीन चार महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उपचाराकरीता नेण्यात आले आहे.

दरम्यान रस्त्याच्या मधोमध आणि धोकादायक वळणावर हा अपघात झाल्यामुळे तळेरे-कोल्हापुर या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली. घाटरस्त्यांमध्ये अनेक वाहने अडकली.रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अपघाताची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीना तातडीने वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात आणले. त्यानंतर या मार्गावरील वाहतुक भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे वळविली. वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीसांकडुन प्रयत्न सुरू होते. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वाहतुक पुर्ववत करण्यात पोलीसांना यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com