कशेडी बोगद्याच्या कामाला वेग ; १.४५ सेकंदात होते पाच मीटरचे खोदकाम

kashedi tunnel work in progress 150 workers are available and work complete in november 2021
kashedi tunnel work in progress 150 workers are available and work complete in november 2021

खेड : मुंबई ते गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा आधुनिक अभियांत्रिकीचा थक्क करणारा प्रकल्प आहे. भारतीय आणि जपानी तंत्रज्ञानाचा संयुक्त वापर येथे केला जात आहे. बोगद्यातील मोठ, मोठे खडक बुमर मशीन लावून फोडले जात आहेत. पाच मीटर खोदकामासाठी या बुमरचा वापर केल्यास फक्त १.४५ सेंकदात ड्रील करून फोडले जाते. एवढा या मशीनचा वेग आहे. अभियंता दिनाच्या पूर्वसंध्येला सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल शिवतारे यांनी सकाळला ही माहिती दिली. 

ते म्हणाले, काम प्रगतीपथावर असून नोव्हेंबर २०२१ मध्ये या बोगद्याचे काम पुर्णत्वाला जाईल. येथील खडक प्रत्येकी २० ते ३० मीटर अंतरावर बदलत असतो, त्याप्रमाणे खुप लक्षपूर्वक काम करावे लागते. या बोगद्याची एकूण लांबी १८४० मीटर असून ४४१ कोटी रूपये खर्च येणार आहे. उजव्या बाजूकडील बोगद्याचे साडेपाचशे मीटरचे काम झाले असून डाव्या बाजूकडील एक हजार मीटर अंतराचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. या बोगद्याचे वैशिष्ट्य असे की बोगदा सुरू झाला की, दर तीनशे मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज तयार करण्यात येणार आहेत.

त्यामुळे आपत्तकालीन परिस्थितीत किंवा प्रवास करणाऱ्या गाडीला परत जायचे असेल तर या पॅसेजचा वापर करून ते आपली गाडी वळवून परत जावू शकणार आहेत. अशी अधुनिक व्यवस्था या बोगद्यात तयार होत आहे. येथे १५० कामगार काम करत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने ६० माणसांचे काम तीन माणसे करत आहेत. पुण्यातील शिंदे डेव्हलपर्स प्रा. लि. हे काम  करत असून पुण्यातील कात्रज बोगदा व खंबाटकीच्या बोगद्याच्या कामाचा अनुभव या कंपनीला आहे.

खेड आणि पोलादपूर या दरम्यान बोगदे

कशेडी घाटाच्या पर्यायी रस्ता असलेल्या कशेडी बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन पदरी आणि येण्यासाठी तीन पदरी रस्ता असलेले दोन बोगदे साकारले जाणार आहेत. सह्याद्री पर्वतराजींचा कातळ फोडून कोकण रेल्वेचा करबुडे लोहमार्ग ज्याप्रमाणे बोगद्यातून नेण्यात आला, त्याप्रमाणेच खेड आणि पोलादपूर या दरम्यान हे दोन बोगदे निर्माण करण्यात येणार आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com