देवीहसोळ गावच्या सड्याच्या सुमारे तीन चौरस किमी परिसरात सुमारे पंधरा ठिकाणी आढळून आलेल्या तिनशेहून अधिक चित्र वैशिष्ट्यपूर्ण रचना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या आहेत.
राजापूर : रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्थेच्या पाठपुराव्याने संचालक, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र यांच्या विशेष प्रयत्नातून युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ प्रस्तावित यादीमध्ये नऊ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यात देवीहसोळ येथील ठिकाणाचा समावेश आहे. आकाराने सर्वात मोठ्या आणि आश्चर्यकारक कातळ शिल्प (Katal Shilp Konkan) रचनांचा समावेश असलेले आणि एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी कातळशिल्प आढळणारे देवीहसोळ हे बहुधा एकमेव गाव आहे.