
राजापूर : माझी वसुंधरा अभियानांतर्गंत विविध उपक्रम राबविणार्या तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने खरवते गावचे स्वतःचे अद्ययावत संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर खरवते गावची मुबलक निसर्गसंपदा, जैवविविधतता, धार्मिक आणि ऐतिहासिक वारसास्थळे, जलव्यवस्थापन, उद्योग व्यवसाय आदींसह खरवते गावच्या सर्वांगीण माहितीसह गावामध्ये राबविण्यात येणार्या विविध उपक्रम यांचा समावेश आहे. या संकेतस्थळाच्या एका क्लिकने निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले खरवते गाव, गावातील ऐतिहासिक-धार्मिक वारसास्थळे अन् जैविविधतता-निसर्गसंपदा आता खर्या अर्थाने जगाच्या नकाशावर आले असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.