खेड:शेतीवर थाटला संसार; चरितार्थाचे साधन बनले आधार

सुसेरी येथील कंचावडे दाम्पत्य; एक एकरात दोन लाखांच्या उत्पन्नाला हवामानाचा फटका
 भाजीपाला
भाजीपाला sakal
Updated on

खेड: कोकणातील अन्य भागाप्रमाणे तालुक्यातील तरुण नोकरी- व्यवसायासाठी मुंबई, पुण्याला जाण्याचा रिवाज आजही कायम आहे. त्यामुळे इथली शेती हळूहळू ओस पडण्याच्या मार्गावर आहे. परंतु, शहरापासून हाकेच्या अंतरावरील धाकटी सुसेरी हे गाव मात्र या साऱ्‍याला अपवाद आहे. गावातील अनेक कुटुंबे ही शेतीतून आपला चरितार्थ साधताना दिसून येतात. मनीषा आणि गंगाराम नारायण कंचावडे हे दाम्पत्य त्यापैकी एक. यंदा मात्र हवामान बदलाचा त्यांच्या शेतीला फटका बसला होता. त्यांचे नुकसान झाले.

मूळचे सुसेरीतील हे रहिवासी आहेत. नारंगी नदीच्या किनारी त्याचे एक एकराचे शेत असून दरवर्षी पावसाळ्यात हे शेत पाण्याखाली जाते. त्यामुळे केलेली भातशेतीतून दरवर्षीच उत्पन्न मिळते, असे नाही. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी आपल्या आईसमवेत वयाच्या बाराव्या वर्षापासून या शेतात काम करण्यास सुरवात केली. त्यांची पत्नी मनीषाच्या मदतीने या ठिकाणी असलेल्या त्यांच्या एक एकरच्या क्षेत्रात भाजीपाला व कडधान्य लागवडीतून ते तब्बल दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न घेतात. यावर्षी मात्र हवामान बदलाचा त्यांच्या शेतीला फटका बसला होता. यावर्षी त्यांनी एक एकरात विविध पिके घेतली होती.

यामध्ये प्रामुख्याने पावटा, चवळी, मका, वांगी, मिरची, भेंडी, गवार, टॉमेटो यासह विविध प्रकारच्या पालेभाज्या घेतल्या आहेत. हवामानातील बदलामुळे अवेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मोठा फरक पडला. कंचावडे यांना यावर्षी यासाठी सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च आला होता. त्यातून त्यांना किमान सव्वादोन ते अडीच लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु बदलत्या हवामानामुळे त्यांना पन्नास हजारांचा तोटाच सहन करावा लागला आहे.

सुसेरी गावातील अन्य काही कुटुंबे शेती करतात. नारंगी नदीला पावसाळ्यात पूर येतो. त्यामुळे शक्यतो भातशेती न करता येथील निवडक कुटुंबे अनेक वर्षे उन्हाळी शेती करीत आहेत. शेतात पिकविलेली भाजी ही खेड बाजारपेठेत विक्रीसाठी येते. सुसेरी गावातीलच महिला वर्ग खेड शहरातील तिनबत्ती नाका, निवाचा चौक, गांधी चौक, बस स्थानक परिसर, भरणे नाका या ठिकाणी भाजी विक्रीसाठी येतो. त्यांच्याकडील ताज्या भाजीला चांगला भाव मिळतो.

अर्धा ट्रक विविध भाज्या सुसेरीतून..

खेड तालुक्यात दररोज दिवसाला साधारण दोन ट्रक भाजी येते. त्यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या यासह इतर विवीधांगी भाज्या बाजारपेठेत येतात. त्यातील दररोज दिवसाला अर्धा ट्रक विविध भाज्या सुसेरी या गावातून येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com