Khelo India Games : जिद्दीच्या जोरावर पालीचा अनुज सरनाईक देशाच्या नकाशावर; नॅशनल बीच गेम्समध्ये महाराष्ट्राला 'सिल्व्हर' मेडल!

Pencak Silat Maharashtra : दीव येथे आयोजित 'खेलो इंडिया बीच गेम्स २०२६' मध्ये महाराष्ट्राच्या पिंच्याक सिलॅट संघाने रौप्य पदक पटकावले. यात रायगड जिल्ह्यातील पाली येथील अनुज सरनाईक याने चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
Maharashtra Shines in Pencak Silat at Khelo India Beach Games

Maharashtra Shines in Pencak Silat at Khelo India Beach Games

Sakal

Updated on

पाली : दीव येथील घोगला बीचवर सुरू असलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 'पिंच्याक सिलॅट' या क्रीडा प्रकारातील 'रेगू इवेंट'मध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक (Silver Medal) प्राप्त केले. या संघामध्ये रायगड जिल्ह्यातील पाली येथील सुपुत्र अनुज सरनाईक याचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com