esakal | कोलझरात कुडासे-बांदा एसटी कलंडली; प्रवासी सुखरुप
sakal

बोलून बातमी शोधा

कोलझरात कुडासे-बांदा एसटी कलंडली; प्रवासी सुखरुप

कोलझरात कुडासे-बांदा एसटी कलंडली; प्रवासी सुखरुप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोलझर : येथील मधलीवाडी पोष्टाजवळ कुडासे-बांदा एसटी कलंडून नुकसान झाले. दैव बलवत्तर होते म्हणून यातील प्रवासी बचावले. हा प्रकार सकाळी ११.३० च्या दरम्यान घडला. येथे रस्ता अरूंद आहे. कुडासे-बांदा बस प्रवाशांना घेवून जात असता मधलीवाडी येथे पोष्टाजवळच्या बोर्डींगच्या परिसरात आली. समोरून येणार्‍या वाहनाला बाजू देताना एसटीचे पुढचे चाक गटारात गेले. येथे गटाराची खोली जास्त आहे. काही क्षणातच पूर्ण एसटी गटारात कलंडली.

काजूचे झाड व गटार यात अडकून राहिले. सुमारे १५ ते २० प्रवासी यात होते. गाडी झाडाला टेकली नसती तर एका बाजूने पूर्ण उलटण्याची भिती होती. कारण खालच्या बाजूला खोलगट भाग आहे. प्रवाशांना चालकाच्या दरवाजाच्या बाजूने बाहेर काढण्यात आले.

loading image
go to top