
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ५९ प्रकारच्या सापांची नोंद झाली आहे. त्यामध्ये बिनविषारी आणि निमविषारी सापांचा भरणा जास्त आहे.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg) अलीकडच्या काळात किंग कोब्राचे (King Cobra) वास्तव्य असल्याचे दृश्य पुरावे सापडले आहेत. जिल्ह्याची जैव समृद्धी शिखरावर असल्याचेच हे संकेत म्हणता येतील. दोनवेळा दोडामार्ग तालुक्यात किंग कोब्राला वस्तीमध्ये पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा जगातील सगळ्यात मोठा विषारी साप सिंधुदुर्गात सापडणे ही मोठी गोष्ट आहे. मात्र, त्याचा वस्तीत असलेला आढळ नक्कीच चिंतेचे कारण मानायला हवे.