अनिल परबांचे दापोलीतील व्यवहार ; किरीट सोमय्या करणार गौप्यस्फोट

अनिल परबांचे दापोलीतील व्यवहार ; किरीट सोमय्या करणार गौप्यस्फोट

दाभोळ (रत्नागिरी) :रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी निसर्गरम्य दापोली (Dapoli)तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांची जागा घेतली आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये आपण याबाबतची माहिती मिळविली असून, लवकरच याचा गौप्यस्फोट करणार, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसी सेंटर व दापोलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमय्या दापोलीच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

kirit somaiya criticism on anil parab Purchase of land case dapoli political news

सोमय्या म्हणाले, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी २०२१ मध्ये स्वत:च्या नावाने या जमिनीचा साठे करार केला; मात्र तो रजिस्टर केला नाही. डिसेंबर २०२० मध्ये ती जागा त्यांनी अंतर्गतरित्या त्यांचे भागीदार सदा कदम यांना विकली, असे दाखविण्यात आले. त्यामुळे कागदोपत्री अनिल परब यांनी जागा खरेदी केली असे दिसत नाही. त्या जागेवर अनिल परब आणि त्यांचे भागीदार सदानंद कदम यांनी रिसॉर्ट उभे केले आहे. तेथे जाण्यासाठी वनविभागाच्या जमिनीतून रस्ता काढला आहे. त्यासाठी परब यांनी पदाचा उपयोग केल्याचा दावा करून या संदर्भात आपण वनविभागाच्या केंद्रीय तसेच राज्यातील कार्यालयांना परवानगी दिली आहे का, याची विचारणा केली. त्यावर अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे आपणास सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र वायकरांच्या नावाने दापोली तालुक्‍यात दोन मालमत्ता असून या सगळ्यांची कागदोपत्री माहिती घेण्यासाठी दापोली येथे आल्याचे सोमय्यानी सांगितले. अनिल परब यांचा जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे का? त्यांनी सदर जमीन त्यांचे भागीदार सदा कदम यांचे नावे का केली? अनिल परब मागे राहून गुंतवणूक करतात का? असे विचारत मंत्री परब यांच्यावर निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनीही काही गंभीर आरोप केला असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

मंत्री जमीन खरेदी-विक्रीत

राज्याचे मंत्री हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात, ही बाब आपल्याला नव्याने माहित झाली. याबाबतचा तपशीलवार खुलासा आपण करणार, असे सोमय्यांनी सांगितले. त्यांच्या दौऱ्यामुळे दापोलीतील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

kirit somaiya criticism on anil parab Purchase of land case dapoli political news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com