आंबा बागायतदार शेखर विचारे यांच्या यशामागचे रहस्य काय ?

Know About Mango Grower Shekhar Vichare Success
Know About Mango Grower Shekhar Vichare Success

गुहागर ( रत्नागिरी ) - पारंपरिक हापूस आंबा बागायतीकडे कृषिउद्योग म्हणून बघितले पाहिजे. तरच बाजारपेठेला अपेक्षित असे उत्पादन आपण घेऊ शकतो. तसे उत्पादन केले तर भावही चांगला मिळतो. हे ओळखून जीआय मानांकन आणि पॅक हाऊसची सुविधा बागेत आणली. त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला, अशी माहिती वरवेली येथील बागायतदार आणि निर्यायतदार शेखर विचारे यांनी दिली. बागेची निगा चांगली राखली तर चांगला नफा असे साधे गणित आहे. 

वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसच्या नावावर कर्नाटकचा आंबा विकला जाऊ लागला तेव्हा अनेकांचा अभिनिवेश जागा झाला. परंतु आजही अनेक पारंपरिक आंबा बागायतदारांनी जी. आय. मानांकन घेतलेले नाही. शेखर विचारेंनी जैव विविधता कायद्यांतर्गत जीआय मानांकनामध्ये बागेची नोंदणी करून घेतली आहे. त्यामुळे "रत्नागिरी हापूस' या ब्रॅण्ड नेमने त्यांना आंबा विकता येतो. त्याचप्रमाणे आज शहरी ग्राहकाला निर्जंतुक, आरोग्यदायी उत्पादने लागतात. हे लक्षात घेऊन विचारे यांनी बागेत पॅक हाऊस बांधले.

सेंद्रिय बागेतून विक्रीसाठी जाणारे प्रत्येक फळ पॅक हाऊसमध्ये सोडियम हायपोक्‍लोराईड मिश्रीत साध्या पाण्यात धुतले जाते. त्यानंतर 45 डिग्री सेल्सिअस इतक्‍या गरम पाण्यात काहीकाळ ठेवले जाते. त्यानंतर रॅपनींगसाठी इथिलीन गॅस चेंबरमध्ये 20 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमानात 48 तास ठेवले जाते. या प्रक्रियेनंतर फळावर रॅपनींग करून, पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवले जाते.

आपल्या बागेची तपासणी झाल्यावर तयार होणाऱ्या अहवालात या सर्वांची नोंद ऑडिटिंग एजन्सी करत असते. हा अहवाल परदेशातील आंबा खरेदी करणाऱ्या, बाजारपेठेतील मोठ्या कंपन्या वाचतात. त्यामुळेच आपल्या मालाला अधिक किंमत मिळते. सोडियम हायपोक्‍लोराईड ट्रीटमेंट आधीपासूनच करत असल्याने कोविड संकटात जास्त फायदा झाल्याचे विचारे यांनी सांगितले. पॅक हाऊसची सुविधा तालुक्‍यातील अन्य बागायदारांसाठीही शेखर विचारे यांनी उपलब्ध करून दिली आहे. 

"" या वर्षीपासून सेंद्रिय आमरस कॅनिंग आणि निर्जलीकरण केलेल्या पिक्‍या हापूसच्या फोडींचे कॅनिंग अशी दोन मूल्यवर्धीत उत्पादने बाजारपेठेत आणत आहोत. '' 
- शेखर विचारे, बागायतदार आणि निर्यायतदार 

सकाळ सेंटरचे मार्गदर्शन
शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचे शिक्षण "सकाळ माध्यम समुहा'च्या सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरमधील कोर्सेसनी दिले. 2014 पासून आंबा निर्यात, ग्रीन हाऊस उभारणी व लागवड, हळद व आलं लागवड आणि प्रक्रिया, भाताची लागवड आणि प्रक्रिया उद्योग हे कोर्स स्लिकमध्ये केले आहेत. याचा मोठा फायदा झाला असे विचारे यांनी सांगितले. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com