esakal | हर्णे : समुद्रकिनारी दर्ग्यासमोरच डॉल्फिन मासा मृतावस्थेत
sakal

बोलून बातमी शोधा

fish

हर्णे : समुद्रकिनारी दर्ग्यासमोरच डॉल्फिन मासा मृतावस्थेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णे : दापोलीतील हर्णे पाजपंढरी कडे जाणाऱ्या रस्त्यालगतच समुद्रकिनारी मृत कुजलेल्या अवस्थेत डॉल्फिन  सापडला. सदर डॉल्फिनला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तिथेच पुरून टाकले.

   गेल्यावर्षी सुद्धा पावसाळ्या अगोदर तालुक्याच्या याच किनारपट्टीला तीन डॉल्फिन मासे मृत अवस्थेत सापडले होते. आता यावर्षी देखील अशाप्रकारे डॉल्फिन मासा मृत होऊन समुद्रकिनारी सापडण्याची सुरुवात झाली आहे अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. यापुढे अजून किती डॉल्फिन मृत अवस्थेत मिळतील याचे सांगता येणार नाही कारण गेल्यावर्षी दोन महिन्यात तीन डॉल्फिन असे मृत अवस्थेत सापडले होते.

हेही वाचा: ये गं गौराबाई...! मंडणगडात पारंपरिक गाण्यांचे सूर

आज सापडलेल्या या डॉल्फिन माश्याच्या तोंडावर दोरखंड गुंडाळलेला होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच किनाऱ्याला लागला असल्याचे वनविभागाने सांगितले. दरवर्षी हे असे डॉल्फिन माशांच्या बाबतीत होत असल्यामुळे निसर्गप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे. सदरचा मासा हा कुजलेल्या अवस्थेत असल्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तिथेच पुळणीत खड्डा काढून पुरण्यात आले.

परंतु हे डॉल्फिन नेमके कोणत्या कारणाने मृत होत आहेत याचा ठोस शोध लावून डॉल्फिन मृत होण्याचे कारण समोर आणणे गरजेचे बनले आहे. यावेळी हर्णे परिसरातील ग्रामस्थ, सर्पमित्र प्रितम साठविलकर, दापोली वनपाल, श्री.सावंत, वनरक्षक, श्री.जळने, श्रीम. जगताप, प्रतीक काष्टे, पाजपंढरी पोलीस पाटील, जनार्दन पावसे आदी उपस्थित होते.

loading image
go to top