आचरा : कांदळवन तोडीबाबत पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांच्या मागणीला यश

मागील सहा सात महिने कांदळवन तोडीबाबत पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांच्या मागणीला यश आले.
ग्रामस्थांच्या मागणीला यश
ग्रामस्थांच्या मागणीला यशsakal
Updated on: 

आचरा : आचरा पारवाडी डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्पा लगतची कांदळवन तोडीबाबत पंचनाम्यासाठी या अगोदर तारखा देवूनही पुर्ण समिती नसल्याने होऊ न शकलेला पंचनामा नुकताच पुर्ण समितीच्या उपस्थितीत पार पडला. मागील सहा सात महिने कांदळवन तोडीबाबत पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांच्या मागणीला यश आले.

कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या उपस्थितीत कांदळवन तोडीबाबत पंचनामे करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत मालवण नायब तहसीलदार आनंद मालवणकर, आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, वनक्षेत्रपाल कुडाळ अमृत शिंदे, वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक विष्णू नरळे, अनिल परब, आचरा मंडल अधिकारी अजय परब, तलाठी अनिल काळे, कोतवाल गिरीश घाडी तसेच श्री. गोसावी, भूमी अभिलेखचे ओंकार आपटे, पोलीस हवालदार महेश देसाई, अक्षय धेंडे आदी सहभागी झाले होते.

ग्रामस्थांच्या मागणीला यश
बेळगाव : अति घाई संकटात नेई; ओव्हरटेकच्या प्रयत्नात तरुण जागीच ठार

पारवाडी डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्पा विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पालगतची कांदळवनाची झाडे तोडल्याची शासनाकडे सहा सात महिन्यापुर्वी तक्रार दाखल केली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमार्फत या भागाची पहाणी केली गेली. या पहाणीत या भागात कांदळवन तोड झाल्याचे निदर्शनास आल्याने सकाळच्या सत्रात प्रकल्पालगत झालेल्या कांदळवन तोडीचा पंचनामा संयुक्त समितीमार्फत केला गेला; मात्र याबाबत उपस्थित पशुराम शेटये, रवींद्र बागवे, प्रदिप केळकर, चंदू कदम, शिर्के, मुळये, साळकर आदी ग्रामस्थांनी अजूनही काही कांदळवृक्षांची तोड झाल्याचे संयुक्त समितीच्या निदर्शनास आणल्यावर नदीच्या भरतीमुळे पहाणी करणे दुपारच्या सत्रात शक्य झाले नाही.

त्यामुळे सायंकाळी ओहोटीच्या वेळी या भागात जाऊन समिती तर्फे कांदळवन तोडीचा पंचनामा केला गेला. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com