
Raigad News: वाढवण बंदरासाठी डहाणू तालुक्यातील घोळ येथे महामार्गालगत वाहतुकीचे बेट उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात जागा बाधित होणार असून, प्रशासनाने प्रकल्पासाठीच्या जागेचे भूमापन सुरू केले आहे, पण स्थानिकांमध्ये यावरून नाराजी आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पनवेल परियोजना इकाईतर्फे प्राप्त प्रस्तावानुसार ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रिया उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सूर्या प्रकल्प डहाणू यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.