कणकवली : विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आतापर्यंत कोणते व्यवसाय केले? त्यांच्याकडे पैसे कुठून आले? त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये कशा जमिनी खरेदी केल्या? ठेकेदार म्हणून किती कामे मिळवली? याची सगळी माहिती मी लवकरच जाहीर करणार आहे. आम्ही कोणता स्वैराचार केला ते दाखवून द्या; अन्यथा तुमचे विषयही चव्हाट्यावर आणू, असा इशारा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला.