कोकण रेल्वेची वाहतूक झाली ठप्प ; एक्सप्रेस थांबल्या स्थानकातच

kokan railway transportation stop from today morning by minor accident inkhed ratnagiri
kokan railway transportation stop from today morning by minor accident inkhed ratnagiri

खेड (रत्नागिरी) : कोकण रेल्वे मार्गावर खवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ वावे गावानजीक रेल्वे रुळावर मेन्टेंन्स व्हॅनच्या मागील दोन चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुक खोळंबली आहे. हे मशीन बाजूला घेण्याचे काम सुरु आहे. सकाळी 7 वाजता हा अपघात झाला. गाडीचे रुळ मार्गावर घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. हे दुरुस्ती वाहन खवटी खेड ते रत्नागिरीकडे जात असताना ही घटना घडली. 

रुळावरून गाडी घसरल्याने रुळाला तडे गेले आहेत. म्हणुन तातडीने रुळ बदलण्याचे काम सुरु आहे. वाहतुक खोळंबल्याने तेजस एक्सप्रेस महाड जवळील वीर स्थानकात तर थांबवण्यात आली असुन मांडवी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आणि अन्य गाड्या चिपळूण, रत्नागिरी या स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. अनेक प्रवासी देखील या स्थानकात अडकून पडले आहेत.

मार्ग सुरु करण्यासाठी रेल्वेचे कामगार प्रयत्न करत आहेत. दरम्यान रेल्वेचे वरिष्ट अधिकारी घटना स्थळी पोहचले असुन हा प्रकार वेल्डफेल्युअरचा असावा असा प्राथमिक अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. जोडलेले रुळ थंडीमुळे ब्रेक होतात. सध्या रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com