esakal | रत्नागिरीतील 56 धरणे झाली फुल्ल ; गडनदी आणि अर्जुना प्रकल्प शंभर टक्के पाणी साठा
sakal

बोलून बातमी शोधा

kokan ratnagiri 9 dams have 100 per cent water storage 56 dams filled this week

 जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या 3 मध्यम प्रकल्पांसह 65 लघु धरणांमध्ये समाधानकारक

रत्नागिरीतील 56 धरणे झाली फुल्ल ; गडनदी आणि अर्जुना प्रकल्प शंभर टक्के पाणी साठा

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या 3 मध्यम प्रकल्पांसह 65 लघु धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा झाला आहे. चांगला पाऊस पडत असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जादा 9 धरणांमध्ये 100 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या आठवड्यात 44 धरणे 100 टक्के भरली होती. तर या आठवड्यात 56 धरणे फुल्ल झाली आहेत. यातील 57 धरणे सुरक्षित असून 8 धरणे असुरक्षित असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. मात्र भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी या धरणांमध्ये अल्प पाणीसाठा ठेवला आहे.


जिल्ह्यात गेल्या चार ते आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आज काहीशी पावसाने उसंत घेतली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये  तिवरे येथील धरण फुटीच्या घटनेनंतर पाटबंधारे विभागाने धरणांच्या सुरक्षिततेला जास्त महत्त्व दिले आहे. त्याअनुषंगाने मध्यम व लघु प्रकल्पांबाबतचा अहवाल दर आठवड्याला प्रसिद्ध केला जातो. जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यंत सरासरी 2086.32 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यंदा पाऊस उसंत घेत चांगलाच कोसळला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे हळूहळू भरू आज त्यांच्यामध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा- अत्यल्प प्रतिसादात चाकरमनी कोकणात दाखल -

शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. धरण क्षेत्रातही पाऊस चांगलाच पडत असल्याने जिल्ह्यातील 65 पैकी 0 ते 25 टक्के भरलेली 2 धरणे, 25 ते 50 टक्केमध्ये 2 धरणे, 50 ते 75 टक्केमधील 3 धरणे, 75 ते 99 टक्केतील 5 धरणे तर 100 टक्के भरलेली 53 धरणे आहेत. मध्यम लघुपाटबंधारे प्रकल्पापैकी नातूवाडी सुमारे 70.49 टक्के, गडनदी आणि अर्जुना प्रकल्प शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यातील 57 धरणे सुरक्षित असून 8 धरणे असुरक्षित आहेत. खबरदारी म्हणून या धरणांमध्ये कमी पाणीसाठा ठेवण्यात आला आहे.  

संपादन - अर्चना बनगे