वैभववाडी : तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस

घाटात कोसळलेली दरड हटविण्यात आली असुन दुपारनंतर वाहतुक सुरळीत झाली आहे.
तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस
तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊसPix_Pratik
Updated on: 

वैभववाडी : सलग तिसऱ्या दिवशी तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व स्थितीतील भातशेती अडचणीत आली आहे. काल (ता.४) करूळ घाटात कोसळलेली दरड हटविण्यात आली असुन दुपारनंतर वाहतुक सुरळीत झाली आहे.

गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही सायकांळी जोरदार हजेरी लावली.चार वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊसाला सुरूवात झाली.सायकांळी उशिरापर्यत हा पाऊस सुरू होता.दरम्यान कालच्या तुलनेत आज वादळी वाऱ्यांचे प्रमाण कमी होते.त्यामुळे कुठेही पडझडीचे प्रकार घडलेले नाहीत.मात्र जोरदार पावसामुळे परिपक्व स्थितीतील भातशेती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली होती.दगड मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापुर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.काल सायकांळी सात वाजल्यापासुन दरड हटविण्याच्या कामाला प्रशासनाकडुन सुरूवात झाली.पहाटे पाच वाजता एकेरी वाहतुक सुरू करण्यात प्रशासनला यश आले. आज दुपारी एक वाजेपर्यत कोसळलेली संपुर्ण दरड हटविण्यात आली.त्यानंतर या मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com