kokan:गावखडीतील समुद्रकिनाऱ्यावरील सुरुबन धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan news

Kokan : गावखडीतील समुद्रकिनाऱ्यावरील सुरुबन धोक्यात

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावरील सुरुबन धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस समुद्र आतमध्ये घुसत असून येथील सुरुबनाची मोठी हानी झाली आहे.गावखडी समुद्राची पाणी मोठ्या प्रमाणात वस्तीच्या भागात जात असल्यामुळे त्याचे संरक्षण करण्यासाठी गावखडी समुद्रकिनारी रत्नागिरी वन विभागाच्या माध्यमातून सागरी किनारी सुरुबन तयार करण्यात आले.

त्यामुळे वस्तीमध्ये घुसणारे पाणी कमी झाले. तसेच पर्यटकांनाही हा किनारा आकर्षित करणारा ठरला आहे. परंतु दिवसेंदिवस समुद्राने भरतीच्या काळामध्ये पाणी सुरूच्या झाडांमध्ये घुसल्यामुळे तेथील भाग दिवसेंदिवस समुद्राने गिळंकृत केला आहे. त्यामुळे सुरुबनाचा भाग कमी झाला आहे.

वन विभागाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी आतमध्ये येण्यास सुरवात झाल्यामुळे भविष्यात सुरुबन समुद्र गिळंकृत करण्याची शक्यता आहे. सध्या पंधरा ते वीस फूट आतमध्ये भरतीच्या पाण्याने अतिक्रमण केले आहे. समुद्रामध्ये फिरणाऱ्या पर्यटकांना धोका निर्माण झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी एक टॉवर गावखडीतील समुद्रकिनाऱ्यावरील सुरुबन धोक्यात बांधण्यात आला आहे.

त्या जागेपर्यंत पूर्वी सुरुबनाची हद्द होती. मात्र हा टॉवर सध्या उघडा पडला आहे. सुरुबनामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक झाडे तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही झाडे कोणत्याही क्षणी समुद्राच्या पाण्यात झेप घेतील अशा स्थितीत आहेत.

वनविभागाकडे पाठपुरावा सुरू : फडके

गावखडी येथील ग्रामस्थ प्रशांत फडके म्हणाले, दिवसेंदिवस समुद्र सुरुबनाचा भाग गिळंकृत करत आहे. त्या संदर्भात वन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. जेणेकरून त्या परिसरात नव्याने लागवड करून परिसराचे संरक्षण करता येईल. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

Web Title: Kokan Suruban Beach Gavkhadi Danger Encroachment Sea Increased Forest Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kokanwaterbeachlight