esakal | कोकणात गुलाबी थंडीची पुन्हा चाहुल 
sakal

बोलून बातमी शोधा

kokan winter season begins is start farmer is satisfied kokan news kokan winter news marathi news

दाट धुके ः बागायतदारांच्या आशा पल्लवीत 

कोकणात गुलाबी थंडीची पुन्हा चाहुल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारेपाटण (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी सकाळी दाट धुके पडत आहे. गुलाबी थंडीचे वातावरण असल्याने आंबा, काजू बागायतदारांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. महामार्गावरही दाट धुक्‍याची दुलई असल्याने वाहन चालकांना वाहने सावकाश चालवावी लागली. 

यंदाच्या जानेवारीतही कडाक्‍याचे ऊन, पाऊस आणि ढगाळ वातावरण पहावयास मिळाले. या बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू पिके धोक्‍यात आली होती. दोन तीन दिवसानंतर होणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यामुळे आंबा, काजू मोहोरावर कितीवेळा कीटकनाशकांची फवारणी करावी असा देखील बागायतदारांपुढे प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र गेले चार दिवस पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागल्याने बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा- राजकीय चर्चेला आले उधाण : हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदाची उदया निवड -

आंबा, काजू पिकावरील पहिला मोहोर जळाला आहे. निदान दुसऱ्या मोहोरामुळे तरी काही प्रमाणात उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा येथील बागायतदारांना आहे. दरम्यान गेले दोन दिवस जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत दाट धुके पहायला मिळत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडीचे वातावरण असल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना वाहनांचे दिवे सुरू करावे लागले होते. खारेपाटण ते झाराप या दरम्यान काही ठिकाणचा अपवाद वगळता दोन्ही बाजूच्या मार्गीका सुरू असल्याने धुक्‍यातही वाहन चालकांचा वेग सुसाट होता. 

संपादन- अर्चना बनगे

loading image