#KonkanRains पुर्येतील डोंगर खचला; पाच घरांना धोका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

साखरपा - पुर्ये येथील डोंगराचा एक भाग खचला असून पाच घरांना धोका निर्माण झाला आहे. सोमवारी झालेल्या अतीवृष्टीमुळे हा डोंगर खचला आहे. धोका निर्माण झालेल्या घरातील नागरिकांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला आहे. त्यांची राहण्याची तात्पुरती सोय शाळेत करण्यात येणार आहे. मातीच्या ढीगाऱ्याखाली भातशेती साग, आंबे आणि काजूची झाडेही गाडली गेली आहेत.  

पुर्ये गावातील धनगरवाडी येथील डोंगर सोमवारी झालेल्या अतीवृष्टीमुळे खचला. ही घटना पहाटेच्या वेळी घडली. हा डोंगर खचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली भातशेती जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय साग, आंबे आणि काजूची झाडेही मातीत गाडली गेली आहेत.

विनोद मोरे, धोंडू खंडगाळे, सुरेश शिंदे, सीताराम मोरे, शंकर माळी, सखाराम पवार यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ह्या भूस्खलनात विद्युत पुरवठा करणारे ३ पोल जमिनीखाली गेले आहेत. त्यामुळे गेले कार दिवस धनगरवाडी अंधारात आहे. 

अधिकाऱ्यांकडून पाहणी भूस्खलनामुळे वाडीतील पाच घरांना धोका निर्माण झाला आहे. या पाचही घरातील नागरिकांना स्थलांतरचे आदेश देण्यात आले आहेत. ह्या कुटुंबांची रहाण्याची व्यवस्था जिल्हापरिषदेच्या शाळेत करण्यात आली आहे. दरम्यान, सरपंच अरुण गोरूले, ग्रामसेवक महेश हातफळे यांच्यासह तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पाहणी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Rains Land slice in Purye in Sakharpa