Kondoshi Swayambhu Mahadev: निसर्गाच्या कुशीत कोंडोशीचा स्वयंभू महादेव; नांगराच्या फाळातून प्रकटल्याची आख्यायिका; तीन नंदी लक्षवेधी

Swayambhu Mahadev Temple in Kondoshi: राजापूर तालुक्यातील केळवली-कोंडोशी येथील स्वयंभू महादेव मंदिर निसर्गरम्य परिसर, तीन नंदी आणि ऐतिहासिक गदेगळामुळे विशेष ठरते.
Kondoshi Swayambhu Mahadev

Kondoshi Swayambhu Mahadev

esakal

Updated on

राजापूर: कोकणच्या लाल मातीत, डोंगर-दऱ्या आणि घनदाट जंगलांच्या सान्निध्यात अनेक प्राचीन देवस्थाने आजही श्रद्धेने जपली जात आहेत. यापैकीच केळवली-कोंडोशी येथील स्वयंभू श्री महादेव मंदिर निसर्ग, शांतता आणि श्रद्धेचा अनोखा संगम आहे. माळरानावरील गर्द झाडीच्या कुशीत वसलेल्या या मंदिराची पारंपरिक कोकणी स्थापत्यशैली त्याची प्राचीनता अधोरेखित करतो. स्थानिक आख्यायिकेनुसार नांगराच्या फाळातून श्री महादेव प्रकट झाले, अशी या मंदिराची श्रद्धा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com