कोयना अवजलाचा वापर कोकणसाठी व्हावा

Konkan Demand Koyna Backwater Which used To produce Electricity
Konkan Demand Koyna Backwater Which used To produce Electricity

राजापूर ( रत्नागिरी ) - कोकणातील शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासह अन्य आवश्‍यक असलेल्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी जलविद्युत निर्मितीनंतर समुद्रामध्ये सोडून वाहून जाणारे कोयना धरणातील पाणी कोकणाला वापरण्यास मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे विधीमंडळातील कोकणचे प्रतोद आणि राजापूरचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

पोफळी येथील कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 4 च्या विद्युतगृहाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे दौऱ्यावर आले होते. या वेळी झालेल्या पाहणीच्यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहनमंत्री आणि पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार साळवी, आमदार भास्करराव जाधव, शेखर निकम, महेश शिंदे उपस्थित होते 

कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये वीजनिर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणातील पाणी समुद्रामध्ये सोडण्यात येते. समुद्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा कोकणातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शेतीच्या वापरासाठी दिल्यास त्याचा कोकणच्या विकासासाठी उपयोग होऊ शकतो. मात्र, तसे नियोजन झालेले नाही.

या गोष्टीकडे आमदार साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी लक्ष वेधले. वीजनिर्मितीनंतर समुद्रामध्ये सोडून देण्यात येणारे पाणी शेतीसह अन्य वापरासाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा चांगला उपयोग होणार असून त्यातून कोकणच्या विकासालाही चालना मिळेल. त्यामुळे हे पाणी कोकणच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com