Mango-Cashew Crop : कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांवर यावर्षी मोठे संकट कोसळले आहे. हवामान बदल आणि बुरशीजन्य रोगांमुळे आंब्याचा मोहोर काळा पडल्याने ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सावंतवाडी : कोकणात आपत्तीमुळे निर्माण झालेला आंबा व काजू नुकसानीचा प्रश्न माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी विधान भवनात उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी आपली लक्षवेधी मांडली.