उधाणाच्‍या भरतीने हेदवी किनाऱ्याच्‍या संरक्षक बंधाऱ्याला धोका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

गुहागर - गेल्या आठवड्यात आलेल्या उधाणाच्या भरतीने हेदवी समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात संरक्षक बंधारा कमकुवत झाला आहे. बंधाऱ्याचे संरक्षक कवच मोडून यावर्षी समुद्राच्या लाटांनी सुरूबनात प्रवेश केला. त्यामुळे किनाऱ्याजवळील बागायती व वस्तीला धोका निर्माण झाला आहे.

बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करावी, असे पत्र हेदवी ग्रामपंचायतीने जिल्हा पत्तन अभियंत्यांना दिले आहे. हेदवी समुद्रकिनारी वर्षानुवर्षे बेसुमार अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. परिणामी समुद्रकिनाऱ्यांची रुंदी कमी झाली. अनेक वेळा भरतीचे पाणी सुरूबनाच्या सीमा ओलांडून वस्तीत शिरू लागले. अखेर दहा वर्षांपूर्वी समुद्राला आडकाठी करण्यासाठी धूपप्रतिबंधक, संरक्षक बंधारा बांधण्यात आला. गेल्या आठवड्यात समुद्राला उधाण आले. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकू लागल्या. सातत्याने येणाऱ्या लाटांनी संरक्षक भिंत कमकुवत झाली. दगड जागवेरून हलले. समुद्राने संरक्षक भिंत ओलांडून सुरूबनात प्रवेश केला. तेथील माती धुपली. काही ठिकाणचा संरक्षक बंधाऱ्याचा भाग वाहून गेला आहे. पावसाळ्यामध्ये लाटांच्या माऱ्यांनी हा बंधारा वाहून जाण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे शासनाने संरक्षक बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

Web Title: konkan news guhagar hedevi Beach