चावा घेतला, की बोबडी वळलीच समजा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

ग्रामीण भागातील हौशी, खवय्ये गरली घेऊन हा मजेशीर अनुभव लुटत आहेत

मंडणगड : कोकणात दमदार पाऊस सुरू आहे. नदी, ओढ्यांना प्रचंड पाणी असून, त्यांचा प्रवाह गतिमान झाला आहे. या पाण्यातून मिळणारे खेकडे पकडण्यासाठी ग्रामीण भागातील हौशी, खवय्ये गरली घेऊन हा मजेशीर अनुभव लुटत आहेत. 

मंडणगड तालुक्‍यातील पाले, तुळशी, पाचरळ, बोरघर, माहू, नारगोली, कोंजर, अडखळ परिसरांतील गावांतून अशी परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे, तर खाडी पट्ट्यातील खाजणात भरती-ओहोटीचे अंदाज बांधून चिखलात बिळातून थिरले काढताना लागणारे कसब पाहून थक्क व्हायला होते. 

हेही वाचा - अत्यल्प प्रतिसादात चाकरमनी कोकणात दाखल..

पहिल्या पावसात खेकडा मादी आपली पिल्ले पाण्यात सोडते. एक खेकडा कमीत कमी शंभर ते दीडशे पिल्लांना सोडून देत असतो. यावेळी ते एका जागेवर स्थिर असतात. गावागावांतून अनेकजण चार चारच्या टोळीने रात्रीच्या वेळेस विजेऱ्यांच्या प्रकाशात हे खेकडे पकडण्यासाठी जातात. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून रवाना होऊन तीन-चार तासांत पुन्हा घरी परतत असून त्यांना मोठ्या प्रमाणावर छोटी, मोठी खेकडे सापडत आहेत. एका खेपेस ते ६० ते ७० खेकडे पकडून आणत असून चवीने खाणारी संख्याही जास्त आहे. 

हेही वाचा -  हेलियम चा शोध कोठे लागला माहीत आहे का ? जाणून घेण्यासाठी वाचा...

चावा घेतला, की बोबडी वळलीच समजा... 

एका काठीला टाकाऊ मांसल भाग बांधून गरली तयार केली जाते. त्याला खाण्यासाठी खेकडे येत असून, पाण्यात टाकलेली काठी फिरली जाते. त्यानंतर ती अलगद उचलून त्याला आलेला खेकडा पकडण्याचे कसब आजमावणे एक वेगळा अनुभव असतो. पकडलेल्या खेकड्याला पिशवीत टाकताना त्यांना कसरत करावी लागते. मात्र, खेकडा पकडताना अंदाज चुकला आणि खेकड्याने हाताला चावा घेतला, की बोबडी वळलीच समजा.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan people enjoying crab special food