कोकण : सासोलीतील ‘त्या’ रस्त्याकडे दुर्लक्षच

खड्ड्यांचे साम्राज्य : उंचीसह डांबरीकरणाची मागणी
sasoli road
sasoli roadsakal

दोडामार्ग : सासोली येथील कायम चर्चेत असलेल्या ‘त्या’ रस्त्याचे डांबरीकरण अद्याप न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’चा अनुभव घ्यावा लागण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात वाहनचालकांचे होणारे हाल लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याची उंची वाढवून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

कुडासे तिठ्यापासून सासोली शाळेपर्यंतचा रस्ता सखल भागात असल्याने पावसाळ्यात तेथे पाणी साचते. शिवाय अनेक वर्षे त्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवणे कठीण होते. मोठा पाऊस पडला की, दोन-अडीच फूट पाणी रस्त्यात साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. सध्या दोडामार्ग-बांदा रस्त्याचे डांबरीकरण जवळपास पूर्ण होत आले आहे.

त्या कायम चर्चेत असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला डांबरीकरण झाले आहे; पण तो रस्ता जैसे थे असल्याने त्याचे डांबरीकरण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आमदार दीपक केसरकर यांनी त्या रस्त्याच्या पाहणीदरम्यान कायम पाण्याखाली जाणारा तो भाग उंच करण्याची आणि वाहते पाणी रस्त्याऐवजी बाजूला पाईप घालून बाहेर काढण्याची सूचना केली होती. त्यानुसार काम होणे आवश्यक आहे.

याबाबत बांधकामच्या कार्यालयात बुधवारी माहितीसाठी संपर्क साधला असता कार्यालयात शिपाई वगळता कुणीही नव्हते. तथापि बांधकामने त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी झालेली अनेक आंदोलने आणि केसरकर यांची सूचना लक्षात घेऊन दर्जेदार, कायम टिकेल असे व रस्त्यात तळे साचणे बंद होईल, अशा पद्धतीने काम करण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com