esakal | Konkan Railway Update: अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनाने केल्या 7 गाड्या रद्द ; 4 गाड्यांचे मार्ग बदलले
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनाने केल्या 7 गाड्या रद्द

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

Konkan Railway Update: अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनाने केल्या 7 गाड्या रद्द ; चार गाड्यांचे मार्ग बदलले

रत्नागिरी: वाशिष्टी (Vashishti)पुलावरील पाणी कमी न झाल्यामुळे कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनाने आणखी सात गाड्या रद्द केल्या आहेत. त्यात मत्स्यगंधा एक्स्प्रेस, सीएसटीएम मंगलूर विशेष, दादर तिरुणवेल्ली डेली स्पेशल, मुंबई मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस, मडगाव मुंबई कोकणकन्या, सावंतवाडी दादर तुतारी आणि दादर सावंतवाडी तुतारी यांचा समावेश आहे. तसेच नेत्रावती एक्सप्रेस, हिसार कोईबतूर विकली, वेरावलं तिरुवानतपुरम, हापा मडगांव या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.(konkan-railway-administration-dishion-7-trains-cancelled-Four-trains-changed-lanes-rain-update-akb84)

ढगफुटीप्रमाणे पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून वेळापत्रक कोलमडले. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलाला लागल्यामुळे सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने गाड्या त्या-त्या स्थानकावर थांबवून ठेवल्या आहेत. तेजस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द केली तर चार गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. नऊ गाड्या आठ ते दहा तास उशिराने धावत होत्या.

हेही वाचा: जाणून घ्या! चिपळूण, खेड पूरपरिस्थितीचे दिवसभराचे अपडेट

अतिवृष्टी, हाय टाईड आणि कोयनेचे पाणी यामुळे वाशिष्ठी नदीला पूर आला होता. चिपळूण शहर आणि परिसरात प्रचंड पाणी भरले होते. वाशिष्ठी नदीवरील रेल्वेच्या पुलाला पाणी लागले होते. या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. खेर्डी स्थानकासह आजूबाजूच्या परिसरातील रुळावरुन पाणी वाहत होते. रुळच दिसत नव्हते. मंगरुळ-सीएसटीएम कामथेला, एर्नाकुलम-निजामुद्दीन संगमेश्‍वरला, अमृतसर रत्नागिरीत, तिरुवअनंतपूरम विलवडेत, तिरुवनेली-दादर राजापुरात, तिरुवनंतपुरम वेर्णा स्थानकात, मांडवी मडगावला तर दादर-सावंतवाडी चिपळूण, मुंबई-मडगाव जनशताब्दी खेड स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती.

सायंकाळपर्यंत पुराचे पाणी ओसरलेले नव्हते. त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प होती. निजामुद्दीन-एर्नाकुलम आणि ओखा एक्स्प्रेस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. मुंबईतून निघणारी आणि मडगावकडे जाणारी तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या बिघडलेले वेळापत्रक केव्हा सुरळीत होईल हे सांगणे अशक्य असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक गेले सात दिवस विस्कळित झाली आहे. ओल्ड गोवा टनेलमध्ये माती आल्यामुळे तीन दिवस वाहतूक विस्कळित होती. पुढे दोन दिवस मुंबईत पाऊस झाल्यामुळे गाड्या उशिराने धावत होत्या. कोकणात मुसळधार पाऊस पडत असल्याने अजून दोन दिवस वेळापत्रक असे राहील, अशी शक्यता आहे.

loading image