उन्हाळी हंगामासाठी  कोकण रेल्वेच्या `या` जादा गाड्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

परतीसाठी करमळी येथून 01048 ही गाडी दर रविवारी सकाळी 11 वाजता करमळी येथून सुटणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी येथे थांबे देण्यात आले आहेत

कणकवली ( सिंधुुदुर्ग ) - कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. 
कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी ते करमळी ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. गाडी क्र. 81047 ही गाडी 3 एप्रिल ते 5 जून या कलावधीत दर शुक्रवारी रात्री 8.45 वाजता सुटणार आहे.

परतीसाठी करमळी येथून 01048 ही गाडी दर रविवारी सकाळी 11 वाजता करमळी येथून सुटणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी येथे थांबे देण्यात आले आहेत.

तसेच पनवेल ते करमळी ही आठवड्यातून एकदा धावणार आहे गाडी क्रमांक 810 49 पनवेल येथून दर शनिवारी रात्री नऊ वाजता सुटणार आहे. 4 एप्रिल ते 6 जून या कालावधीत ही गाडी धावेल परतीसाठी दर शनिवारी गाडी क्र 01050 करमळी येथून सकाळी 10.40 वाजता सुटणार आहे. याचबरोबर एलटीटीत ते करमळी ही विशेष गाडी दर शुक्रवारी 10 एप्रिल ते 5 जून या कालावधीत जाणार आहे. 

गाडी क्रमांक 01045 ही एलटीटी येथून रात्री 1.10 वाजता सुटणार आहे. तर परतीसाठी करमळी येथून गाडी क्रमांक 01046 ही गाडी दुपारी 12. 50 वाजता सुटणार आहे. तसेच एलटीटी - सावंतवाडी ही विशेष गाडी सोडण्यात आली आहे. ही गाडी 6 एप्रिल ते 8 जून या कालावधीत दर सोमवारी धावणार आहे. गाडी क्रमांक 010 37 रात्री 1.10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक 01038 सावंतवाडी येथून दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ असे थांबे देण्यात आले आहेत. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway Extra Trains For Summer Season Sindhudurg Marathi News