
चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावरील अतिजलद जनशताब्दी एक्स्प्रेसचे परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. गेले काही दिवस ही गाडी उशिरा मुंबईला पोहोचत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईत पोहोचणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरा घर गाठावे लागत आहे. वंदे भरत ही रेल्वे वेळेत पोहोचावी आणि प्रवासी या रेल्वेकडे आकर्षित व्हावेत म्हणून रेल्वे व्यवस्थापनाकडून मुद्दाम जनशताब्दी एक्स्प्रेस उशिरा सोडली जात असल्याचा आरोप प्रवाशांमधून केला जात आहे.