
Konkan Railway Employee : कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या एका बिहारी बाबूला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मोहम्मद उस्मान घनी (वय २५, बिहार) असे त्याचे नाव आहे. प्रवाशांशी ओळख वाढवून त्यांना चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन दोन मोबाईल, पर्स चोरली होती. रेल्वेतून प्रवास करताना अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ अगर पिऊ नका. प्रवासात सतर्क राहण्याचे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.