esakal | Konkan Railway Update - पाणी ओसरलं; कोकण रेल्वे पुन्हा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Railway Update - पाणी ओसरलं; कोकण रेल्वे पुन्हा सुरु

Konkan Railway Update - पाणी ओसरलं; कोकण रेल्वे पुन्हा सुरु

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : वाशिष्ठी नदीचे पाणी ओसारल्यानं कोकण (konkan Railway) रेल्वे पुन्हा सुरु झाली. शनिवारी सकाळी पावणेचार वाजता ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री करुन वाहतूक सुरू करण्यात आली. (chiplin Flood live) कोकण रेल्वेच्या अभियंते, कामगारांनी भर पावसात सलग काही तास रात्रभर काम करत मार्ग पूर्ववत केला आहे. शनिवारी सकाळी राजधानी एक्सप्रेस डाऊन या मार्गवरून रवाना झाली. कोकण रेल्वे मार्ग पूर्ववत झाला असला तरी या मार्गावर सध्या ट्रेन नाहीत. (konkan rain update) केवळ मार्ग पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. लवकरच कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची घोषणा होईल असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात : नागरिकांसाठी 'हे' हेल्पलाईन

loading image
go to top