esakal | चिपळूणात ढगफुटी; बाजारपेठा पाण्याखाली, पुराचे पाणी घरांमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूणात ढगफुटी; बाजारपेठा पाण्याखाली, पुराचे पाणी घरांमध्ये

चिपळूणात ढगफुटी; बाजारपेठा पाण्याखाली, पुराचे पाणी घरांमध्ये

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे (heavy rain chiplun) चिपळूण जलमय झाले आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून अंतर्गत मार्ग (road closed) बंद झाले आहे. (konkan rain update) २००५ ची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा (market closed) पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

२६ जुलै २००५ ला ढगफुटी झाल्यामुळे चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यावधीची हानी झाली होती. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्टचा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपायोजना केल्या होत्या.

हेही वाचा: Konkan Rain - रत्नागिरी जलमय; पुराचे पाणी रस्त्यावर

मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले आहेत. रात्रभर जोरदार पाऊस पडल्याने आणि कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे.वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅंड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.

loading image