Konkan Rain Update - मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

पडझडीमुळे नुकसान; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम
Konkan Rain Update - मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार (heavy rain) पावसाने झोडपले. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. राजापूर, रत्नागिरी, दापोलीत दरडींसह संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. जगबुडी, भारजा, वाशिष्ठी, शास्त्री, गडनदीसह काजळी, अर्जुना नद्यांची पाणी पातळी कायम (river water level) असून पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराची शक्यता आहे.

रत्नागिरी (ratnagiri) शहरात सखल भागात पाणी साचले आहे. धामणसे व ओरी मार्गावर रत्नेश्‍वर देवळाच्या मोरीवरील रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहतूक बंद ठेवली आहे. गोळप येथील आणखी काही भाग खचला आहे. तासभराची पावसाची विश्रांती पाणी ओसरण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे पुरपरिस्थिती नाही. मात्र, घरांची पडझड ठिकठिकाणी सुरुच आहे. शिळ धरणाच्या सांडव्याजवळील आणखी काही भाग खचला असून आतापर्यंत आंबा, काजूची चाळीस झाडे उन्मळून गेली आहेत. खालगाव येथील एका तर डोर्ले येथील एका गोठ्याचे पावसामुळे अंशतः नुकसान झाले. दापोली तालुक्यात हर्णै येथील विक्रांत अनंत मयेकर यांच्या गाडी पार्कींगमध्ये पाणी शिरल्यामुळे गाडीचे १ लाख २० हजाराचे नुकसान झाले.

Konkan Rain Update - मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित
सिंधुदुर्गात पाटबंधारेसाठी 505 कोटी; विनायक राऊत यांची माहिती

बुरोंडी, मंडणगड, खेर्डी, दाभोळात पडझड

बुरोंडीतील हाजिरा ईस्माईल बुरोडकर यांच्या घराचे अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. मंडणगडात एका घराचे साडेअकरा हजाराचे तर एका पडवीचे साडेनऊ हजाराचे नुकसान झाले. दापोलीतील खेर्डी, करजगाव, अडखळ येथे तीन ठिकाणी संरक्षक भिंत कोसळून तीन घरांचे पंचवीस हजाराचे नुकसान झाले. दाभोळमध्ये दरड कोसळून घराची भिंत कोसळली. राजापूरात प्रभानवल्ली गणेशखारेवाडी एका घराची संरक्षक भिंत कोसळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com