मिऱ्या किनारी आक्राळ विक्राळ स्वरुपाच्या लाटांचे तांडव; बंधाऱ्याचे भवितव्य धोक्यात, अजस्त्र लाटांनी मनात भरतेय धडकी

लाटांचे तांडव पाहून यंदाच्या उधाणानामध्ये हा बंधारा तग धरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
Mirya Beach Ratnagiri
Mirya Beach Ratnagiriesakal
Summary

समुद्राला आलेल्या उधाणामुळे दोन ते तीन मीटरच्या महाकाय लाटा उसळत होत्या. एका पाठोपाठ एक या लाटा बंधाऱ्यावर आदळत होत्या.

रत्नागिरी : एकीकडे मुसळधार पाऊस (Ratnagiri Rain) कोसळत असताना दुसरीकडे उधाणामुळे समुद्राचे रौद्ररुप पहायला मिळाले. मिऱ्या किनाऱ्यावर (Mirya Beach Ratnagiri) सुमारे दोन ते तीन मीटरच्या अजस्त्र लाटा अपूर्ण बंधाऱ्यावर येऊन आदळत होत्या. लांटाचे आक्राळ विक्राळ स्वरुप पाहून तेथील रहिवाशांच्या मनात धडकी भरत होती. एवढ्या उंच लाटा उसळत होत्या की त्या बंधाऱ्यावरून वस्तीत शिरत होते.

लाटांचे तांडव पाहून यंदाच्या उधाणानामध्ये हा बंधारा तग धरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. मिऱ्या बंधाऱ्याचा सुमारे साडेतीन किमाच्या पक्का बंधारा मंजूर झाला आहे. सुमारे १६० कोटी रुपयांचा हा धूपप्रतिबंधक बंधारा आहे. यासाठी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विशेष प्रयत्न केले होते. तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले.

Mirya Beach Ratnagiri
'लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत'; इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा मोठा दावा

साडेतीन किमी लांबीचा हा बंधारा दोन वर्षात पूर्ण करायचा अवधी आहे. परंतु वेळत काम सुरू न करणे किंवा पूर्ण न केल्याबद्धल पत्तन अभियंत्यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली. या कामापैकी पांढरा समुद्र ते जयहिंद चौक या टप्पा अपूर्णच आहे. या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्थानिक पत्तन विभागाच्या मागे होते. परंतु तोवर पावसाळा सुरू झाल्यामुळे हे काम लांबले आहे. त्यामुळे जुन्या बंधाऱ्यावरच स्थानिकांच्या सुरक्षेची भिस्त आहे.

परंतु यंदाच्या उधाणामध्ये हा बंधारा तग धरुन राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. समुद्राला आलेल्या उधाणामुळे दोन ते तीन मीटरच्या महाकाय लाटा उसळत होत्या. एका पाठोपाठ एक या लाटा बंधाऱ्यावर आदळत होत्या. त्यामुळे हे पाणी बंधाऱ्या बाहेर मानवी वस्तूमध्ये शिरत होते. उधाण असे राहिले तर बंधारा फोडून समुद्राचे पाणी मानवी वस्तीत घुसण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली.

उधाणाच्या लाटांमुळे बंधारा कधी वाहून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे पाणी मानवी वस्तीत शिरण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे स्थानिकांवर टांगती तलवार आहे. प्रशासनाने याची योग्य ती खबरदारी घ्यावी.

-प्रताप भाटकर, स्थानिक ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com